कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबतच्या सरकारी आदेशाचे पालन करून दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथी मा. सौ. अर्चना परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जास्त गर्दी होवू न देण्यासाठी या वेळी केवळ महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी मा. सौ. अर्चना परेश ठाकूर यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना नमूद केले की पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना असे लक्षात येते की आपला देश अत्यंत वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि करोना आजाराच्या संकटातसुध्दा आपल्या देशाने उल्लेखनीय कार्य केले आहे आणि आपण सर्वांनी एकजुटीने आपला देश मजबूत केला पाहीजे.
शेवटी आभार प्रदर्शन करताना प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी प्रमुख अतिथी मा. सौ. अर्चना परेश ठाकूर, यांचे तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन श्री. रामशेठ ठाकूर साहेब तसेच कार्यकारणी सदस्य तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, श्री. नकटी सर यांचे तसेच विद्यार्थ्यांचे आणि विधी महाविद्यालयाच्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले. त्यांनी या निमिताने सर्व विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की खरी देशभक्ती सिध्द करण्यासाठी आपल्याला बॉर्डरवर जाण्याची गरज नसून आपण करत असलेली कामे प्रामाणिकपणे आणि वेळच्यावेळी केली तर ती सुध्दा एका अर्थाने देशसेवाच ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. कु. संघप्रिया शेरे यांनी केले. यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कु. प्रियांका उंडे, श्री. निनाद शेंडगे, कु. भाग्यश्री पाटील, श्री. हितेश छटानी, सौ. पल्लवी खोत, हृषीकेश हुद्दार, उज्वल पाटील, प्रमोद कोळी, संजय दरवडा, नितीन कोळी, सचिन पवार, महेश घरत, महेश पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.